Home औरंगाबाद सतीश चव्हाणांची उमेदवारी; आज होणार घोषणा

सतीश चव्हाणांची उमेदवारी; आज होणार घोषणा

8
0

हॅटट्रीकसाठी चव्हाण सज्ज

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. सतीश चव्हाण चव्हाणांना यंदा महाविकास आघाडीचे पाठबळ असल्याने ते हॅट्रीक साधरणा का? हाच या निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा आहे.


महाविकास आघाडीची ताकद चव्हाणांच्या कामी : गेल्या दोन निवडणुकीत सतीश चव्हाण चव्हाण यांनी पदवीधर मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पहिल्या निवडणुकीत विद्यमान आमदार श्रीकांत जोशी आणि गेल्या निवडणुकीत शिरीष बोराळकर यांचा त्यांनी पराभव केला होता. आता सतीश चव्हाण चव्हाणांना काँग्रससह शिवसेनेची मदत या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे त्यांचा विजय सहज समजला जातो आहे.


भाजपात तीन दावेदार : पदवीधरसाठी भाजपमधून शिरीष बोराळकर, प्रविण घुगे आणि प्रा. गजानन सानप यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यात शिरीष बोराळकर यांचे पारडे जड मानले जाते. शिरीष बोराळकर यांची असणारी देवेंद्र फडणवीसांशी जवळीक महत्वाची ठरेल, अशी शक्यता वाटते. तर घुगे आणि सानप हे दोन्ही बहूजन चेहरे असल्याने त्यांच्यातही उमेदवारी देतांना काही गोष्टींचा विचार पक्षीय पातळीवर होणार आहे.


नाथाभाऊंच्या प्रवेशाने चव्हाणांना फायदा
पदवीधर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर खानदेशी मतदारांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील सिडको-हडकोसह शिवाजीनगर आणि सगळ्या परीसरात खानदेशी मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यात नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्याचा फायदा निश्चित सतिष चव्हाणांना होईल, अशी आपेक्षा आहे. त्यात काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद चव्हाणांच्या पाठीशी असेल, त्याचाही फायदा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here