Home Uncategorized संजूबाबाचा कॅन्सरवर विजय; ट्विटरवर दिली माहिती

संजूबाबाचा कॅन्सरवर विजय; ट्विटरवर दिली माहिती

84
0

मुंबई : चित्रपट अभिनेता संजय दत्तने कर्करोगाविरोधात लढाई जिंकली आहे. स्वत: संजूबाबाने याविषयाी आपल्या ट्विटरवर माहिती दिली असून तुम्हा सर्वांना ही आंनदाची बातमी सांगताना माझे मन कृतज्ञतेने भरलंय. मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचे संजय दत्तने म्हटले आहे.

ऑगस्टमध्ये संजय दत्तला अॅडवान्स स्टेजचा फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर संजय दत्त अनेकवेळा मुंबईच्या लीलावती आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी येत जात होता. मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. परंतु ते म्हणतात ना देव जास्त संकटे ही सर्वात शक्तिशाली लोकांच्याच वाट्याला देतो. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीचे मी या लढाईतून विजयी झाल्याने मला आनंद झाला आहे. हे तुमच्या समर्थनाशिवाय शक्य झाले नसते. संकट काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेले माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचा मनापासून आभारी आहे. माझ्या प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार. खासकरुन कोकिलाबेन रुग्णालयातील डॉ. सेवंती आणि तिच्या टीमचे मनापासून मी आभार मानतो. ज्यांनी माझी खूप काळजी घेत मला यातून बाहेर काढले, असे निवेदन संजय दत्तने आपल्या सोशल अडाऊंटवर शेअर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here