Marathwada Sathi

सॅनिटायझरमुळे येऊ शकते ‘अंधत्व’…?

मराठवाडा साथी न्यूज

पॅरिस : कोरोनापासून बचाव होण्यासाठी हात हॅण्ड सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.मात्र,हॅण्ड सॅनिटायझरमुळे विषाणूंपासून बचाव होत असला तरी यामुळे लहान मुलांना अंधत्व येण्याची भीती आहे. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार हॅण्ड सॅनिटायझरच्या वापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होणाऱ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्रेंच पॉइजन कंट्रोल सेंटरच्या च्या संशोधकांनी हॅण्ड सॅनिटायझरच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या समस्येत वाढ झाली असल्याचे संशोधनात सांगितले आहे.त्यानुसार डोळ्यांमध्ये रसायने गेल्यामुळे झालेल्या घटनांमधील १५ टक्के प्रकरणे ही हॅण्ड सॅनिटायझरशी संबंधित होती. वर्ष २०२० मध्ये सार्वजनिक स्थळी लहान मुलांच्या डोळ्यात चुकून हॅण्ड सॅनिटायझर गेल्याची ६३ घटना घडल्या. तर, २०१९ मध्ये अशी एकही घटना नोंदवण्यात आली नव्हती. करोनाच्या संसर्ग वाढल्यानंतर हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हॅण्ड सॅनिटायझरमध्ये ७० टक्के अल्कोहोल असते.

दरम्यान,यासंदर्भात‘JAMA Ophthalmology’ या वैद्यकीय नियतकालिकात संशोधन प्रकाशित झाले आहे.

Exit mobile version