Home परळी वैजनाथ स्वच्छता मिस्कीन,बांधकाम आडेपवार,पाणी पुरवठा मुंडे,शिक्षण आंधळे तर महिला बाल कल्याण सभापती शिंदे

स्वच्छता मिस्कीन,बांधकाम आडेपवार,पाणी पुरवठा मुंडे,शिक्षण आंधळे तर महिला बाल कल्याण सभापती शिंदे

327
0

परळी
परळी नगरपालिकेच्या आज झालेल्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नव्या चेहर्यांना संधी दिली असुन एक वर्षाच्या खंडानंतर शिक्षण सभापती पदाची जबाबदारी गोपाळ आंधळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे पीठासन अधिकारी म्हणुन उपस्थित असलेल्या या विशेष बैठकीत सभापतीची निवड करण्यात आली.परळी नगरपालिकेत सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असल्याने व नगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवुन ठेपल्याने आजच्या सभापती निवडीत धनंजय मुंडे हे कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले होते आज झालेल्या या निवड प्रक्रियेत न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या उपस्थितीत सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले.प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.आज झालेल्या या निवडीमध्ये, स्वच्छता सभापतीपदी अन्वर मिस्कीन,पाणी पुरवठा सभापतीपदी उर्मिला गोविंद मुंडे,बांधकाम सभापतीपदी अन्नपुर्णा आडेपवार, महिला व बालकल्याण सभापतीपदी गंगासागर शिंदे  तर शिक्षण सभापतीपदी  गोपाळ आंधळे यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here