Marathwada Sathi

थिएटर चालकांसाठी सलमानचा मोठा “निर्णय”

Eid ला थिएटर मध्येच प्रदर्शित होणार सलमान खानचा “राधे ” चित्रपट

मुंबई : सलमान नेहमीच मदतीसाठी धावून येत असतो. याबाबतचे अनेक किस्से आपण ऐकलेच असतील . आता सलमान थिएटर चालकांसाठी धावून आला आहे. त्याचा बहुप्रतीक्षित “राधे “चित्रपट या वर्षात ईद ला रिलीज होणार आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्म वर नाही तर थिएटरवर . यासाठी भाईजानने चक्क २५०१ कोटींची ऑनलाईन रिलीजची ऑफर नाकारली आहे. सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका घेतली आहे.त्याने ट्विटरवर याची माहिती दिली आहे.

“माफ करा, सिनेमागृहांच्या मालकांसोबत चर्चा सुरु असल्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा उशीर झाला. सध्या करोनामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. थिएटरचे मालक आणि एक्सहिबिटर्स सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राधे हा चित्रपट मी थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. इंशाअल्लाह २०२१ मध्ये ईदच्या मुहुर्तावरच चित्रपट प्रदर्शित होईल.” अशा आशयाचं ट्विट सलमान खानने केले आहे.

Exit mobile version