Marathwada Sathi

सलमान युसूफ खानची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला कन्नड भाषा येत नसल्यामुळे अधिकाऱ्याकडून गैरवर्तन

डान्स इंडिया डान्स सीझन 1′ चा विजेता सलमान युसूफ खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची कहाणी सांगितली. सलमान दुबईला जाण्यासाठी बंगळुरूहून विमानतळावर गेला, तिथे त्याला कन्नड भाषा येत नसल्यामुळे त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले.”मी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जात आहे आणि मी एका इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटलो जो माझ्याशी कन्नडमध्ये बोलत होता. मी त्यांना मोडक्या तोडक्या कन्नड भाषेत सांगत होतो की मला भाषा कळते पण बोलता येत नाही.””तरीही तो मला कन्नडमध्ये बोलत, पासपोर्ट दाखवतो आणि तुझे वडील बेंगळुरूचे आहेत तरी तुला कन्नड कसे बोलावे ते कळत नाही, त्यावर मी उत्तर दिले की बंगळुरूमध्ये जन्म घेतल्याचा अर्थ असा नाही. मी ही भाषा घेऊन जन्माला आलो असे नाही.”
मी बंगळुरूमध्ये जन्मलो, जगभर फिरू शकतो. मी सौदी अरेबियात लहानाचा मोठा झालो. मला कन्नड कधीच कळले नाही. मी माझ्या शालेय शिक्षणादरम्यान या देशात राहिलो नाही. मला जे काही कन्नड कळते ते केवळ माझ्या मित्रांमुळे यावर तो पुढे म्हणतो की… जर तुम्हाला कन्नडी येत नसेल तर तुम्हाचावर संशय येणारच

सलमानने घडलेल्या प्रसंगाबाबत एक लांबलचक नोट लिहिली आहे. “मी त्यांना म्हणालो की तुमच्यासारखे निरक्षर लोक या देशात राहिले तर हा देश कधीच प्रगती करू शकणार नाही. यावर तो नुसता मान खाली घालून बडबडत होता. मी विमानतळ अधिकाऱ्यांना या घटनेची तक्रार करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कोणीही मला मार्गदर्शन करत नाही. माझ्या शहराचे प्रतिनिधित्व केले आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, आता मला या अशिक्षित लोकांसमोर स्वत:ला सिद्ध करायचे आहे.”

https://www.instagram.com/p/CpyKFXEBHWm/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version