Marathwada Sathi

रद्दीच्या नावांखाली सुस्थितीतील साहीत्याची विक्री!

बीड
बीड जिल्ह्यातील समाजकल्याण विभाग वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत येत असते भ्रष्टारचे कुरण झाले आहे, समाजकल्याण मध्ये बीड समाज कल्याण आयुक्त व खाजगी गुत्तेदार संगनमत करुन अनेक वेळा असा साहीत्या, रद्दी, च्या नावा खाली अल्प किंमतीत विक्री केले आहे. अगोदर पण अशी संगणमत करून खाजगी गुतेदाराच्या घशात घातले आहे. समाज कल्याण आयुक्त मडावी यांनी केले, कागदोपत्री कामे दाखवून बोगस बिले देखील या महाशयांनी उचलली आहेत, याची चौकशी चालू आहे, तोच हा नवीन प्रकार उघडकीस आला असून समाजकल्याण विभागातील सुस्थितीत असलेल्या कार्यालयीन खुर्च्या,टेबल कपाट,फर्निचर व रद्दी मे. सना एंटरप्राइजेस यांना दरपत्रकावर विक्री केली आहे.
कार्यालयीन लोखंडी व लाकडी खुर्च्या, टेबल, कपाट, फर्निचर सुस्थितीत असून त्याची तोडफोड करून सहा.आयुक्त समाजकल्याण बीड यांनी मे. सना एंटरप्राइजेस यांच्यासोबत संगनमत करून त्याचे वजन न करता आमच्या समक्ष विक्री केल्याचा आरोप आरपीआयचे मिलिंद पोटभरे, वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे धम्मानंद वाघमारे, गौतम कांबळे, लखन जोगदंड, विनोद सवाई यांनी केला असून प्रकरणी मा.जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

Exit mobile version