Marathwada Sathi

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भगवे वादळ

शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज लावल्याने वाद निर्माण झाला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा हा ध्वज तात्काळ हटवला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यानंतर शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाऊन भगवा ध्वज फडकावणार अशी गर्जना केली होती.त्यामुळे आता शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस समोरासमोर आले आहेत.

कन्नक रक्षक संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा रद्द झाला होता. मात्र कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले असून कर्नाटकमध्ये घुसून महापालिकेसमोर भगवा ध्वज फडकावणार असा निर्धार केला आहे.त्यामुळे या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

Exit mobile version