Home मनोरंजन थोडक्यात बचावला रितेश…!

थोडक्यात बचावला रितेश…!

35
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने सामान्य नागरिकांना नवीन सायबर फसवणूकीबद्दल सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे,ज्यामध्ये बहुतेक सेलिब्रिटी खात्यांना टार्गेट केले जात आहे. रितेश असेही म्हणाला की,लोक या फसवणुकीला तेव्हाच बळी पडत आहेत जेव्हा ते पेज वरील लिंक ला क्लिक करत आहेत. रितेशने ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.त्याने ट्विट मध्ये लिहिले आहे की, “मला हे इंस्टाग्रामच्या थेट संदेशात आढळले हॅशटॅगसायबरफ्रॉड हॅशटॅगवेयर.”पोस्ट केलेल्या या संदेशाच्या स्क्रीनशॉट मध्ये लिहील आहे की, “आपल्या इंस्टाग्राम खात्यावरील एका पोस्टने कॉपीराइटच उल्लंघन झाले आहे आणि हे जर आपल्याला चुकीचे वाटत असेल तर आपण यावर अभिप्राय द्या, अन्यथा आपले खाते २४ तासांच्या आत बंद होईल.आपण खालील लिंक वर क्लिक करून आपला अभिप्राय देऊ शकता. “असे त्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलेले आहे.

दरम्यान,यासंदर्भात रितेशने अजून एक ट्विट केले आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की,मला हि असा एक थेट मेसेज मिळाला आहे. पण सुदैवाने मी दिलेल्या लिंकवर क्लिक केले नाही. अलीकडेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे सायबर फसवणूकीचे प्रकार समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्ला लक्ष्य केले जात आहे. यात चित्रपट निर्माते आनंद एल. राय,अभिनेते विक्रांत मस्से आणि उर्मिला मातोंडकर, कोरियोग्राफर-दिग्दर्शक फराह खान आणि गायिका आशा भोंसले आणि अंकित तिवारी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here