Marathwada Sathi

दरात ४ रुपयांची वाढ….


मराठवाडा साथी न्यूज
मुंबईः करोनामुळे आर्थिक उत्पन्न बुडालेल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे संकट आहे. वाढत्या डिझेल दरामुळे महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होईल. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जाणार आहे.. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लीटर डिझेल लागत असून, डिझेल खरेदीसाठी वर्षांला ३ हजार कोटींची तरतूद केली जाते.

टाळेबंदीत प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली.
१ हजार १२५ प्रवासी एसटी गाडय़ांमध्ये बदल करून त्याचे मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. सध्या त्यांच्या ६२ हजार फेऱ्या होत असून ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने महामंडळाने अखेर मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

– १०० किमीच्या आतील मालवाहतुकीसाठी एसटीला मोठा प्रतिसाद आहे.

– एकेरी मालवाहतुकीचा दर प्रति किमी किमान ४२ रुपये आकारण्यात येत असून, प्रतिदिवस मालवाहतुकीसाठी ३,५०० रुपये भाडे निश्चित केले आहे.

– १०१ किमी ते २५० किमीपर्यंत प्रति किमी ४०, तर २५१ किमीच्या पुढे ३८ रुपये प्रति किमी दर आकारण्यात येणार आहेत.

Exit mobile version