Marathwada Sathi

बातमीमध्ये कॉमेंट करणे वृत्तपत्रांचा अधिकार – केरळ उच्च न्यायालय

मुंबई : बातमी आणि बातमीबद्दल मत छापणे हा वृत्तपत्रांचा अधिकार आहे. असे मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. आर. चंद्रशेखरन यांनी मल्ल्याळम मनोरमा या वृत्तपत्रावर अब्रू नुकसानीचा दावा केला होता. २०१६ मध्ये आर. चंद्रशेखरन आणि इतर दोघांविरोधात दक्षता विभागाच्या चौकशीबद्दल या वृत्तपत्रात बातमी छापली होती . या बातमीत त्यांना आरोपी संबोधण्यात आले होते, मात्र त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता . यामुळे आरोपी म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे व यामुळे आपली मानहानी झाल्याचे नमूद करत आर. चंद्रशेखरन यांनी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. याविरुद्ध वृत्तपत्राच्या संपादकांनी न्यायालयात अपील दाखल केले होते.

आर. चंद्रशेखरन यांच्यावर नंतर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या तपासात दक्षता विभागाच्या या अहवालही दखलही हेण्यात आली.उच्च न्यायालयाने हे सर्व विचारात घेऊन प्रसिद्ध झालेली बातमी हि दक्षता विभागाच्या अहवालाशी सुसंगत आहे. यात आरोपी म्हणून केलेला उल्लेख वृत्तपत्राचे मत असले तरी ते लोकांच्या हिताशी निगडित आहे. यामागे कोणताही दुर्हेतू दिसत नाही. असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

बातमीतील शब्द अवमानकारक असले तरीही त्याचा संबंध सत्याशी निगडित आहे.आणि जेव्हा ते लोकांच्या हितासाठी छापले जाते , तेव्हा तो गुन्हा ठरत नाही. असे मत न्या. पी. सोमराजन यांनी व्यक्त केले. यामुळे अश्या तक्रारी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा पराभव करण्यासाठी दाखल केल्या जातात, असे ताशेरेही उच्च न्यायालयाने ओढले .

Exit mobile version