Marathwada Sathi

ठाकरे गटाला दिलासा: समता पक्षाचा मशाल चिन्हाबाबत मोठा निर्णय


दिल्ली : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला . धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे. आता ठाकरे गटाला मशाल चिन्ह घेऊनच निवडणुका लढवय्या लागणार आहेत . मात्र इथेही ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत समता पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हावर दावा केला होता याच पार्श्वभूमीवर समता पक्षाच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर आज समता पक्षाच्या वतीनंं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही पक्षानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं होतं. अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता. मात्र या धक्क्यासोबतच आणखी एक धक्का बसला, तो म्हणजे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला जे मशाल हे चिन्ह दिलं आहे, त्यावर देखील समता पक्षाने आपला दावा सांगितला व ते आज याच निर्णययाविरुद्धत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय घेणार या कडे ठाकरे गटाचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version