Marathwada Sathi

सरस्वती प्रतिमेमुळे नाकारला “यांनी ” विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार!

नागपूर: भारतीय संस्कृतीत देवी सरस्वतीला शिक्षणाचे प्रतीक मानले जाते. पण आता सरस्वती प्रतिमेमुळे एका साहित्यकांनी पुरस्कार नाकारला आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे जीवनव्रती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते. यात साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी साहित्यीक मनोहर यांनी केली होती. मागणी केल्यानंतर देखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

डॉ. ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र डॉ. मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवले आहे.

Exit mobile version