Marathwada Sathi

दहावी-बारावीच्या परिक्षांसंदर्भात ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी (२०२१) एप्रिल – मे महिन्यात घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येतील. दरम्यान, विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा यासाठी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहेत.अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतात. मात्र,कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला होतील.

Exit mobile version