Home महाराष्ट्र मेगाभरती करा अन्यथा …… ,OBC चा सरकारला इशारा!

मेगाभरती करा अन्यथा …… ,OBC चा सरकारला इशारा!

221
0

मुंबई: राज्य सरकारने लवकरात लवकर मेगाभरतीची प्रक्रिया सुरु करावी. अन्यथा येत्या 20 तारखेला ओबीसी समाजाकडून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येईल.असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुंबईत आज ओबीसी समाजाची पहिली राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रमुख नेते हजर होते. ठाकरे सरकारने मेगाभरतीची प्रक्रिया राबवावी. अन्यथा आम्ही मेगा आंदोलन करु, असे त्यांनी सांगितले

विजय वडेट्टीवार यांचे OBC महामेळावा आयोजनाचा दावा :
राज्यातील ओबीसी समाजात असंतोष आहे. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहे. नागपुरातही ओबीसींचा महामेळावा होईल. या मेळाव्यात राज्यभरातून तब्बल 1 लाख लोक येतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता.ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगाभरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here