Marathwada Sathi

सलग 5 पराभवानंतर अखेर आरसीबीचा विजय!

महिला आयपीएल स्पर्धेत सलग पाच पराभवानंतर अखेर आरसीबीचा विजय . एलिस पेरीच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने युपीला 135 धावांवर रोखले . त्यानंतर 18 व्या षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले आहे . महिला आयपीएल स्पर्धेतील आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे . सलग पाच पराभव झाल्यामुळे आरसीबीचा संघाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते . पण या विजयासह आरसीबीने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय.

आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेकी जिंकत युपीला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. एलिसा पैरीने अचूक टप्प्यावर मारा केला. अवघ्या 31 धावांत युपीचा अर्धा संघ परतला होता. एलिसा हेली, देविका वैदय, टी मॅकग्रथ, सिमरन शेख हे खेळाडू रन्स करण्यात अपयश आले.किरन नवगिरे हिने 22 धावांची छोटेखानी खेळी केली. तर ग्रेस हॅरीस हिने 46 धावांची खेळी केली. ग्रेसच्या 46 धावांच्या मदतीमुळे युपीने 100 धावांचा पर्यत गेली .

आरसीबीकडून एलिसा पेरी हिने उत्कृष्ट गोलंदाजी केली. एलिसा पेरी हिने 4 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या. तर सोफी डिवाइन हिने 4 षटकात 23 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. आशा शोबाना हिने 4 षटकात 27 धावा खर्च करत दोन जणांना परत पाठवले . तर मेगना सुचित आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकीनी एक एक विकेट घेतली

135 धावांवर युपीला रोखल्यानंतर आरसीबी संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरली … पण संघाची सुरुवात खूप खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना एकही रन न करता बाद झाली . सोफी डिवायनलाही मोठी खेळी करता आली नाही. 14 धावांत आरसीबीची सलामी जोडी बाद झाली , त्यातच नंतर एलिसा पेरीही बाद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवाची चर्चा सुरु झाली होती. पण हेथर नाईट (24), कनिका आहुजा (46) आणि ऋचा घोष (31) यांनी आरसीबीला विजय मिळवून दिला. युपीकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय देविका वैदय, सोफी एस, ग्रेस हॅरीस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

Exit mobile version