Marathwada Sathi

आरबीआयचा आदेश: ३१ मार्चपर्यंत बँकां सुरु राहणार, रविवारीही होणार काम

बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत सुरू राहतील. आरबीआय ने बँकांना ३१ मार्चपर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण एन्युअल क्लोझिंग आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे. म्हणूनच आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, या महिन्यातील सरकारशी संबंधित सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत निकाली काढावेत. यासाठी त्यांनी बँकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.
आरबीआय च्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, सरकारशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा ३१ मार्च रोजी सामान्य कामकाजाच्या तासांपर्यंत उघडा ठेवाव्या लागतील. बँकेने असेही म्हटले आहे की नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट प्रणालीद्वारे ३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ पर्यंत व्यवहार सुरू राहतील.
सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम आवश्यक निर्देश जारी करेल. DPSS RBI अंतर्गत येते. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांचा अहवाल देण्यासाठी रिपोर्टिंग विंडो ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी दुपारपर्यंत खुली राहील.

Exit mobile version