Marathwada Sathi

यंदाही व्याजदर ‘जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. याचबरोबर या वर्षीचा विकास दर 9.5 टक्के राहिल असा देखील अंदाज व्यक्त केला आहे. पण यापूर्वी तो 10.5 टक्के असेल असासुद्धा अंदाज व्यक्त केला गेला होता. आरबीआयने सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत हे विशेष.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये देखील कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहणार आहे. याचसोबत मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल. या वर्षीचा महागाईचा दर हा 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर महागाईचा कमी होत असलेला दर आणि मान्सूनची सकारात्मक शक्यता या घटकांमुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना व्यक्त केली आहे.

Exit mobile version