Marathwada Sathi

राऊत यांनी उगीच घोषणा करू नये…!

मराठवाडा साथी न्यूज

नांदेड : राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर घोषणा करायला नको होती. याबाबत त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.हे विधान करताना नितीन राऊत यांनी वीज बीलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केल्याची अप्रत्यक्ष कबुली अशोक चव्हाण यांनी दिली आहे. महाविकास अघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या खात्यांना निधीच दिला जात नाही, अशी तक्रार होत आहे.

वीज बिलात सवलतीची घोषणा करुनही काँग्रेसकडे असलेल्या ऊर्जा खात्याला निधी मिळाला नसल्याचे विचारल्यानंतर त्यांनी हे विधान केले.नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version