Home औरंगाबाद प्रदेशाअध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल……..

प्रदेशाअध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल……..

297
0

मराठवाडा साथी न्यूज


औरंगाबाद : काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी काल भाजपकडून तीव्र निदर्शनं केली गेली.मेहबूब शेख यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र कारवाई होत नसल्याने भाजप आक्रमक झाली आहे.औरंगाबादमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक करावी, आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काल बलात्काराचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझे मोबाइल रेकॉर्ड तपासा, अगदी नार्को टेस्टही करा. दोषी असलो तर फासावर जायला तयार आहे,’ असं शेख यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. मेहबूब शेख यांना यावेळी सांगितलं आहे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here