Home क्राइम कोचिंग सेंटरवर केला बलात्कार ….

कोचिंग सेंटरवर केला बलात्कार ….

71
0

मराठवाडा साथी न्यूज

बूंदी: राजस्थानच्या बूंदी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खासगी कोचिंग सेंटरच्या संचालकाने दोन वर्षे या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपीने विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी अल्पवयीन मुलीला तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो दाखवून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत असल्याचे कुटुंबीयांनी तक्रार करताना सांगितलं आहे.

पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोध सुरू केला आहे. आरोपी फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. कोचिंग सेंटरचा संचालक दोन वर्षे लैंगिक अत्याचार करत होता. तसेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here