Home Uncategorized रंगीबेरंगी रांगोळीने सजला बाजार

रंगीबेरंगी रांगोळीने सजला बाजार

13
0

मराठवाडा साथी : राकेश रवळे

औरंगाबाद : सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. काही दिवसात दसरा आणि दिवाळी सण येणार आहेत. त्यानिमित्त शहरात रांगोळी दाखल झाली आहे. ग्राहकांकडून प्रचंड प्रमाणात रांगोळी खरेदी केली जाते आहे. त्यामुळे तिला मागणीही तेवढीच वाढते आहे. रांगोळी हि भारतीय संस्कृतीतील महत्वाचा भाग आहे. सर्व सण उत्सवामध्ये रांगोळीचे महत्व अधोरेखित होते. रांगोळी हे नव्या उत्कर्षाची आयुष्यात रांगोळीच्या रंगांप्रमाणे हर्षाचे ,स्नेहाचे, प्रेमाचे, सुखाचे रंग भरावे या हेतूने दारात रांगोळी काढली जाते. वेगवेगळे चिन्ह तसेच कलाकृतीने रांगोळी काढत भारतात उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे रांगोळीला नेहमीच मागणी असते. गुजरातमधील छोटा उदयपुर येथून हि रांगोळी शहरात आणली जाते. सध्या गुलमंडी , सुपारी हनुमान मंदिर, औरंगपुरा याठिकाणी याचे विक्रेते असतात.

अगरबत्ती,धूप, कापूर (नागपूर ) येथुन माल मागवण्यात आले आहे रांगोळी चे १५ ते २० रु प्रति किलो साधारण भाव आहे . रांगोळी हि रात्रीच्या वेळेस चमकून दिसावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चमकी व रंग आले आहेत. पांढरी रांगोळी हि १० ते १२ रु प्रति किलो आहे.घरासमोरील अंगणात शेणाचे सारण केले जाते. ज्याला भारतीय संस्कृतीत अद्वितीय महत्व आहे. पण शहरात शेण मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने कृत्रिम पिवळा रंग विकण्यात येतो. ज्याची सर्वाधिक विक्री होत असते. यासाठी पिवळया रंगाची पुडी बाजारात उपलब्ध आहे .
अगरबत्ती , धूप , कापूर यांची मागणी मोठ्या प्रमाणात ग्राहक करत आहे . अगरबत्तीमध्ये वेगवेगळा सुगंधाच्या अगरबत्तीचा मागणी ग्राहक करत आहे

चमकीची अगरबत्ती ठरतेय ग्राहकांचे आकर्षण :
यावर्षी चमकीची अरबत्ती ग्राहकाचे नवे आकर्षण ठरते आहे. त्याची किंमत १०० रुपये पासून सुरु होत्व असल्याने ग्राहकांकडूनत्याला पसंती मिळते आहे.

इलेक्ट्रॉनिक कापूर जाळण्याची मशीन :
यावर्षी इलेक्ट्रॉनिक कापूर जाळण्याची मशीन बाजारात दाखल झाली आहे. ज्याची किंमत १०० पासून ते २०० पर्यंत आहे. यात कापूर जळाल्याने दूरवर सुगंध पसरतो. त्यामुळे ग्राहक त्याला खरेदी करण्यास पसंती देत आहेत. यात सुगंधी कापूर जाळून घरात धुर करून वातावरण प्रसन्न होते . कमी कापुरमध्ये जास्त सुगंध मिळणारी हि मशीन आहे. .


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here