Home संस्कृती माटुंग्यात रंगली सुरमयी होळी

माटुंग्यात रंगली सुरमयी होळी

11192
0

मुंबई l होळीच्या सणानिमित्त आयोजित करण्यात आलेला “रंग बरसे” हा होळी गीतांचा कार्यक्रम मैसूर हॉल, माटुंगा येथे पार पडला. कला म्युझिक अकादमीतर्फे धनश्री नाईक आणि राजेंद्र कांबळे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी मनोज संसारे यांनी उपस्थित राहून आयोजक व गायकांना शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका रसिका धामनकर आणि नेहा केळकर यांनी आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायिका धनश्री नाईक, राजेंद्र कांबळे, चाँदनी दिदारसिंग, रितेश वंजारी, प्रमोद तांबे, शैलेश शिंदे, जागेश्वर राठोड, संजीव, नासिर पटेल, माजिद, अजय गुप्ता, परेश, इसरार, मन्नू खान, सुनील मांजरेकर यांनी धमाल होळीगीते सादर केली तर विजय ओव्हळ यांनी निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here