Home मनोरंजन रणबीर चा नवीन सिनेमा,भेटीला …

रणबीर चा नवीन सिनेमा,भेटीला …

60
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : नवीन वर्षात रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ‘कबीर सिंह’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या पुढील सिनेमात रणबीर कपूर झळकणार आहे. सिनेमाचं नाव ‘अॅनिमल आहे. अॅनिमल’ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या व्हिडीओला रणबीर कपूरचा आवाज आहे तो आपल्या वडिलांबाबत बोलत आहे. व्हिडीओवरुन अंदाज लावला जात आहे की, हा एक फॅमिली ड्रामा आहे. चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा हे कलाकार देखील दिसणार आहेत. अनिल कपूरने चित्रपटाचा टीजर आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. अनिल कपूरनं म्हटलं आहे की, या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी उत्सुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here