Home मनोरंजन रणबीर-आलिया यांचा आज ‘साखरपुडा’…?

रणबीर-आलिया यांचा आज ‘साखरपुडा’…?

70
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दीर्घकाळापासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत.२०२० च्या सुरुवातीला ते लग्न करणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र तसे झाले नाही.असे असले तरी वर्षाअखेरीस आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.रणबीर-आलिया आज साखरपुडा करणार असल्याच्या बातमीला उधाण आले आहे.कारण,मुंबई विमानतळावर आलिया ,रणबीर बरोबर नितु कपूर आणि रिधिमा कपूर साहनी दिसून आल्या. फक्त एव्हढेच नाही तर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील यावेळी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CJX1_reHXFI/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CJXljx3HJ0F/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान,नीतू कपूर यांनी रणवीर-रणबीर बरोबरचा जयपूरमधील एक फोटो पोस्ट केला होता.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्टचे वडील दिग्दर्शन-निर्माता महेश भट्ट,रणबीर कपूरची बहिणी रिद्धिमा कपूर साहनीचा नवरा भारत साहनी, मुलगी समारा आणि आदर जैन देखील रणथंबोरमध्ये पोहोचणार आहेत.सोबतच करण जोहर देखील रणथंबोरमध्ये दाखल होणार आहे.सुरुवातीला अशी माहिती समोर येत होती की हे सर्व सेलिब्रिटी न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले आहेत, मात्र आलिया-रणबीरच्या जवळच्या व्यक्ती एकत्र आल्याने आज दोघांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.हे सर्वजण रणथंबोरच्या अमन हॉटेलमध्ये थांबले आहेत.

दरम्यान,रणबीर-आलियाच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here