Home औरंगाबाद रमेश पोकळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रमेश पोकळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

363
0

औरंगाबाद : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या तालमीत तयार झालेले मराठवाड्यातील शैक्षणिक चळवळीत सक्रिय असलेले शिक्षक पदवीधर नेते रमेशभाऊ पोकळे यांनी आज औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज रमेशभाऊ पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची प्रतिमा व पुतळा सोबत घेवून आपली उमेदवारी दाखल केली आहे.
यावेळी आपल्या उमेदवारी संदर्भात बोलताना रमेशभाऊ पोकळे म्हणाले की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आज असते तर भाजपा ची उमेदवारी मलाच मिळाली असती व आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द गोपीनाथरावजी मुंडे साहेब आले असते…पण दुर्दैवाने मुंडे साहेब आज आपल्या मध्ये हयात नाहीत त्यामुळे साहेबांच्या आर्शीवादाने व साहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने उमेदवारी दाखल केली असल्याचे रमेशभाऊ पोकळे यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here