Marathwada Sathi

रजनीकांत यांचा राजकारणातून दुरावा…!

मराठवाडा साथी न्यूज

तमिळनाडू : सुपरस्टार रजनीकांत येत्या काळात सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या.याबाबत स्वतः रजनीकांत यांनीही संकेत दिले आहे .काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.रुग्णालयातील उपचारांनंतर त्यांना घरी जाण्यासाठी रजाही देण्यात आली. पण, येत्या काळात आपल्या तब्येतीवरच लक्ष देणार असल्याचं सांगत त्यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये आपण तूर्तास दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कामयच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली, तर रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीसाठी हा निर्णय घेतल्यामुळं अनेकांनीच त्यांच्या या निर्णय़ाचं स्वागत केल आहे.

Exit mobile version