Home आरोग्य कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या डॉ दिलीप मस्के नाईक यांचा राजेश टोपेंनी केला सत्कार

कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या डॉ दिलीप मस्के नाईक यांचा राजेश टोपेंनी केला सत्कार

690
0

कळमनुरी : कोरोना काळात योध्याप्रमाणे राज्यातील डॉक्टरांनी भूमिका बजावली. त्यांच्यामुळे हजारो कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले. आपल्या जीवाची पर्वा न करता या “कोविड योध्यांनी “अखंड सेवा बजावली. यात खाजगी दवाखाने आणि डॉक्टरांनीही महत्वाची भूमिका निभावली. याच काळात कळमनुरी येथील डॉ दिलीप मस्के नाईक यांनी आपल्या खाजगी दवाखान्यात शहरातील व ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व रुग्णांचे उपचार करून रुग्ण सेवा दिली.

त्यांच्या या कार्याचे कौतुक करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचा सत्कार केला. राजेश टोपे यावेळी हिंगोली दौऱ्यावर आले होते. त्यांनी डॉ. मस्के यांचे कौतुक करत अखंड सेवा बजावण्याचा कानमंत्रही दिला.यावेळी कळमनुरी चे नगरसेवक मो नाजीम रजवी यांचीही उपस्थित होती.डॉ. मस्के यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here