Marathwada Sathi

राज ठाकरेंकडून मराठी भाषा गौरवदिनी संकल्प जाहीर;

मराठी ही आपली मातृभाषा आहे, आज मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचीही मागणी केली जात आहे.
या सर्वामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ते काम करत असलेल्या संकल्पनेचं गुपित जाहीर केले आहे. ते नवी मुंबईत मराठी दिनी निमित्त आयोजित एका मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरेंना मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा संग्रह आहे. त्यांना विविध विषयांवरील पुस्तकं वाचण्यास आवडतात हे सर्वांनाच माहितीआहे. विदेशात कॉफी टेबल बुकचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. हा ट्रेंडआता मराठीतही येणार आहे.

याची सुरूवात राज ठाकरें स्वतः करणार असून, त्यासाठीचे काम सुरू असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. आपण सध्या गानसम्राज्ञी लता दीदींच्या पुस्तकावर काम करत असून, दीदींच्या जयंतीला म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे. या पुस्तकावर दीदींची भाच्ची रचना शहा, अंबरीश मिश्रा यांच्यासह अनेक मंडळी या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे राज म्हणाले.

हे पुस्तक फोटो बायोग्राफ्री किंवा नेमक्या कोणत्या स्वरूपात असेल यावर राज ठाकरेंकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून, हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच नेमकं कसं असेल हे कळेल असे म्हणत राज ठाकरेंनी पुस्तकाबाबतचं गुपित कायम ठेवले आहे. व्यंगचित्रांमुळे वाढलं वाचन भाषेने तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. व्यंगचित्रामुळे माझं वाचन वाढल्याचे राज ठाकरे म्हणाले. इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऐतिहासिक लेखन वाचायला आवडतं असेदेखील राज यांनी यावेळी सांगितले. याशिवाय शिवरायांचे चरित्र वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version