Marathwada Sathi

वर्धापन दिनीच राहुल गांधी इटलीला रवाना…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे.मात्र,आजच काँग्रेस चे खासदार राहुल गांधी हे इटलीला रवाना झाले आहे.त्यांचे असे अनेक इटलीला जाण्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केल्या जात आहे तशीच त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.त्यामुळे भाजप नेत्यांना काँग्रेस नेत्यांनी प्रतिउत्तर दिले आहेराहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचे काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितले आहे.

दरम्यान,भाजप नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत ‘राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे.आता ते इटलीला परत गेले आहेत’असे म्हणत राहुलवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याला विरोधाचे काहीच कारण नाही.काँग्रेस अध्यक्षा दिल्लीत आहेत.राहुल गांधी हे त्यांच्या कामानिमित्त परदेशी गेले आहेत,त्यामुळे टीका करायची गरज नाही. यावर फार भाष्य करणे उचित नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

‘राहुल गांधी त्यांच्या आजीला पाहण्यासाठी गेले आहेत. त्यात चुकीचं काय? प्रत्येकाला वैयक्तिक दौऱ्यावर जाण्याचा अधिकार आहे. भाजप अतिशय खालच्या स्तराचे राजकारण करत आहे. ते राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत कारण त्यांना एकाच नेत्याला लक्ष्य करायचं आहे.’असे म्हणत काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी भाजप नेत्यांना प्रतिउत्तर दिले.

Exit mobile version