Marathwada Sathi

पर्यटकांवर काळाचा घाला…!

मराठवाडा साथी न्यूज

कर्नाटक : फिरण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे.धारवाड राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ११ जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अपघातातील जखमींना धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहुन काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात असतांना धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली.हा अपघात इतका भीषण होता की,यात मिनी बसचा चुराडा झाला आहे.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवाशांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version