Home इतर वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घातला घाला

वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घातला घाला

109
0

मराठवाडा साथी न्यूज

प्रतापगड : वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळानं घाला घडल्याची हुर्योदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो ट्रकच्या पूर्ण खाली गेली होती. या गाडीचा चुराडा झाला होता. रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६ मुलांचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून हा भीषण अपघात समोर आला आहे. माणिकपूर पोलिस ठाण्यातील देशराज इनारा येथे हा अपघात झाला. रात्री उशिरा मिरवणुकीहून येत असताना भरधाव बोलेरो कारनं ट्रकला भीषण धडक दिली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ५ मृतदेह बाहेर काढले असून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here