Home अंबाजोगाई अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते दिनदर्शिका प्रकाशन

अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते दिनदर्शिका प्रकाशन

550
0

अंबाजोगाई
येथील अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका-2021 चे प्रकाशन अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले.

अंबाजोगाई शहरातील सहकार भवन येथे मंगळवार,दिनांक 28 डिसेंबर रोजी अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका-2021 चे प्रकाशन अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,अंबाजोगाई शहराच्या वैभवात व आर्थिक विकासात भर घालण्याचे काम सर्वांना सोबत घेवून सुरू आहे.आम्ही सहका-यांनी एकञ येत मागील काही वर्षांत अंबाजोगाई पीपल्स बँक,श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था,योगेश्वरी मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी आणि क्रांतीज्योती साविञीमाई फुले महिला नागरी पतसंस्था या चार वेगवेगळ्या आर्थिक संस्थांची स्थापना करून गरजूंना आर्थिक ताकद,आधार दिली.सहकार्य केले.तसेच बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमातून शिक्षण क्षेत्रात ते भरीव कार्य करीत आहोत.या सोबतच प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळामार्फत घेण्यात येणा-या बालझुंबड मधील विविध स्पर्धांच्या माध्यमातून नवप्रतिभांना सशक्त व्यासपीठ मिळवून देत आहोत.याद्वारे अनेक कलावंत घडले आहेत.पुढे ही घडतील असे राजकिशोर मोदी म्हणाले.याप्रसंगी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाशचंद सोळंकी,संचालक तथा महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके,दत्ताञय दमकोंडवार,पुरुषोत्तम चोकडा,श्री योगेश्वरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर,व्हाईस चेअरमन तथा नगरसेवक मनोज लखेरा,योगेश्वरी मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी चे चेअरमन रिकबचंद सोळंकी,व्हाईस चेअरमन खालेद चाऊस,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,अंबाजोगाई पीपल्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड,योगेश्वरी पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन कुलकर्णी,योगेश्वरी मल्टीस्टेटचे व्यवस्थापक संतोष ढगे,क्रांतीज्योती
सावित्रीमाई फुले महिला नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक यासोबतच सर्व चारही संस्थेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त दिनदर्शिका

अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते.सामाजिक बांधिलकी जोपासत अंबाजोगाई पीपल्स बँक,श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था,योगेश्वरी मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी आणि क्रांतीज्योती साविञीमाई फुले महिला नागरी पतसंस्था या चार संस्था आर्थिक क्षेत्रात कार्य करीत आहेत.अंबाजोगाईचे शहराचे अर्थकारण गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.दिनदर्शिका दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.अतिशय आकर्षक व सुबक छपाई तसेच आपले सण,उत्सव,याञा.
महत्वाची तिथी,वार,ठेवीवरील व्याजदर,बँकिंग सेवा-सुविधा,योजना,कार्यालयीन वेळा या बाबतची माहीती संकलित करून ती एकञितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे.अंबाजोगाई पीपल्स बँक,श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था,योगेश्वरी मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी आणि क्रांतीज्योती साविञीमाई फुले महिला नागरी पतसंस्था या चार संस्थेचे सभासद, ग्राहक,ठेविदार तसेच सर्व अंबाजोगाईकरांना ही दिनदर्शिका उपयोगी पडेल असा विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here