Home नागपूर विजयी मुलीची काढली घोड्यावरुन मिरवणूक…!

विजयी मुलीची काढली घोड्यावरुन मिरवणूक…!

691
0

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : नुकतीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक पार पडली आहे.या निवडणूत युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंतचा सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विविध ठिकाणी करण्यात आलेला जल्लोष राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.असाच अनोखा जल्लोष नागपूर जिल्ह्यातील उमेरड मध्ये देखील दिसून आला.उमरेड तालुक्यातील शीतल सहारे हिला गावकऱ्यांनी चक्क घोड्यावर बसवून तिची विजयी मिरवणूक काढली.

शीतल सहारे(वय २४) ही उमरेड तालुक्यातील सावंगी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली होती.शीतल विजयी झाल्यानंतर तिची थेट घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली असून सावंगी ग्रामपचांयतीमध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून विजयी झाली आहे.दरम्यान,शीतल सहारेच्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here