Home मनोरंजन ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची अ‍ॅम्बेसिडर बनली प्रियांका चोप्रा

ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची अ‍ॅम्बेसिडर बनली प्रियांका चोप्रा

377
0

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईल्समुळे नेहमीच प्रकाशझोतात राहत असते. तिची लोकप्रियता लक्षात घेऊन तिला ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने एक मोठी जबाबदारी दिली आहे. प्रियांका चोप्रा-जोनास आता ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची दूत म्हणजेच अ‍ॅम्बेसिडर बनली आहे. पुढच्या वर्षभरासाठी ती त्या फॅशन कॉन्सिलसाठी काम करणार आहे. प्रियांकानेच ट्विटरवर ही माहिती दिली.

प्रियांका चोप्रा हे नाव जागतिक फॅशन इंडस्ट्रीतले मोठे नाव बनले आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियांकाची चर्चा जगभरात आहेच. प्रियांकाने बॉलीवूड बरोबरच हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचा चााहता वर्ग जगभरात दिसून येतो . प्रियंकाने निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर अमेरिकेत सेटल झाली आहे. तिथे ती सातत्याने सोशल वर्क करत असते. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये ती काम करते आहे. तिच्या कामाची दखल घेऊनच ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने तिला आपली दूत म्हणून नेमलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here