Home मनोरंजन प्रिया वारियरचे ‘लाडी लाडी’ गाणे रिलीज

प्रिया वारियरचे ‘लाडी लाडी’ गाणे रिलीज

228
0

“ओरु अदार लव्ह” यामध्ये आपल्या डोळ्यांच्या घायाळ करणाऱ्या अदांनी प्रिया वारियर एका दिवसात तुफान हिट झाली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या गाण्यामुळे. प्रियाचा नवीन म्यूजिक व्हिडीओ आला आहे. हे एक तेलुगू गाणं असून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नाव ‘लाडी लाडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्यूजिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.

या गाण्यात प्रिया सोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युजिक दिले आहे. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here