Marathwada Sathi

खासगी शाळा अजूनही ‘बंदच’…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुणे जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या खासगी शाळा आजपासून(४ जाने.)सुरू होणार होत्या.मात्र या शाळा आज सुरु झाल्या नाहीत.महानगर पालिकेच्या पथकांची पाहणी तसेच शिक्षकांची कोरोना चाचणी न झाल्याने अजूनही शाळा ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मॉडर्न गणेशखिंड, दामले, कटारिया या शाळाही आज उघडण्यात आपल्या नाहीत.

दरम्यान,राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती.मात्र,कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे मुंबई,ठाणे महानगरपालिकांनी तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतही शाळा बंद ठेवण्याकडेच कल दिसत होता. त्यामुळे महानगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील खासगी आणि महापालिकांच्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.मात्र त्यानंतरही पालकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे पुन्हा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Exit mobile version