Marathwada Sathi

खासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…!

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : कोरोना व्हायरस च्या संक्रमणामुळे लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर आजपासून हे खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यात आले आहे.पुन्हा एकदा क्लासेस सुरु झाल्यामुळे क्लासेसच्या संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील वर्षभर सर्व छोटे,मोठे क्लासेस बंद होते.यामुळे क्लासच्या जागेचे भाडे,कर्जाचे हप्ते, शिक्षक कर्मचार्‍यांचे पगार, इतर घरगुती व आजारपणाचे खर्च निघत नसल्याने अनेक क्लास चालक आर्थिक अडचणीत सापडले होते. या सर्व परिस्थितीचा विचार प्रशासनाने करावा तसेच कोरोना रुग्णसंख्येचही प्रमाण कमी झाल्याने क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासगी कोचिंग क्लास असोसिएशन कडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली होती.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन क्लासेस कडून करण्यात येत असून आज पासून क्लासेस सुरु करण्यात आले आहेत.

Exit mobile version