Marathwada Sathi

लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेत्री मानसी नाईक लवकरच आपला बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत विवाह बंधनात अडकणार असून मानसीच्या घरी लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.नुकतीच मानसीच्या घरी ग्रहमख पूजा पार पडली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.ग्रहमख पूजेचे फोटो मानसीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत.यावेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून यामध्ये ती अतिशय सुंदर दिसते आहे.

१९ जाने. ला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार असून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता.प्रदीप हा बॉक्सर सोबतच मॉडेल आणि अभिनेताही आहे.

दरम्यान,मानसीच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

https://www.instagram.com/p/CKHVs8WgrIq/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version