Marathwada Sathi

रामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुष’चा पोस्टर प्रदर्शित

मुंबई: बहुचर्चित ‘आदिपुरुष ‘ चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी आज राम नवमीच्या निमित्तानं चित्रपटातं आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आतापर्यंत शेअर करणाऱ्या पोस्टरपेक्षा हे पोस्ट वेगळं आहे.
‘आदिपुरुष’च्या टीमकडून हे पोस्ट आजच्या दिवशी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या नवीन पोस्टवर राम, सीता, लक्ष्मण तर हनुमान दिसत आहेत. यात रामाच्या भूमिकेत प्रभास, तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसतेय.तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे देखील हनुमानाच्या भूमिकेत असलेला पाहायला मिळतोय.
‘मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम’ असं कॅप्शनही हे पोस्ट शेअर करताना दिलं आहे. चित्रपटाचं हे पोस्ट प्रेक्षकांना आवडलं असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. या चित्रपटात वीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. वीएफएक्सचा दर्जा हा प्रेक्षकांना खटकला होता. या सिनेमाची तुलना अॅनिमेटेड कार्टूनसोबतही करण्यात आली होती.दरम्यान, वादामुळं प्रदर्शनाच्या तारखेत अनेकदा बदल करण्यात आले आहेत. आता हा सिनेमा १६ जून रोजी सिनेमा होणार प्रदर्शित आहे.प्रेक्षकांची नाराजी पाहून निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वीएफएक्सवर काम करण्यात आलं. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळं आता हा सिनेमा नेमकी काय जादू करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
रामजन्माचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रामचरित्रातील एका पर्वावर आधारित आहे. हा चित्रपट प्रभू रामचंद्र यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो. अतिशय भव्य आणि आधुनिक स्वरूपात रामाचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच जोमानं आमची टीम काम करत आहे. काही काळानंतर मागे वळून बघताना ‘आदिपुरुष’ या कालखंडातील एक महत्त्वाची कलाकृती मानली जाईल, असं मला वाटतं.

Exit mobile version