Home औरंगाबाद ‘टिप्या’च्या डेअरिंगवर पोरी फिदा

‘टिप्या’च्या डेअरिंगवर पोरी फिदा

86
0

कोण आहे ‘टिप्या’ ? : भाग दुसरा
मराठवाडा साथी Exclusive
राकेश रवळे

औरंगाबाद : तरूणाईचा जोर, त्याच डेअरिंगची क्षमता आणि धतिंग करण्याची सवय या सगळ्या गोष्टी ज्या एखाद्या तरूण पोरीला आवडू शकतात, त्या सगळ्या सवई ‘टिप्या’मध्ये होत्या. म्हणूनच तो कॉलेज गोईंग पोरींमध्ये लोकप्रिय होता आणि आहेही. टेक्नोसॅव्ही असल्याने सोशल मीडियावरही टिप्या अॅक्टिव्ह आहे.

स्टंटच्या जोरावर दहशत
वेगवेगळ्या गाड्या वेगाने चालविण्यापासून ते सिंघमसारखी जीप फिरवू शकणारा म्हणून ‘टिप्या’ची ख्याती होती. त्याच जोरावर त्याने कॉलेजच्या मुला-मुलींवर इंप्रेशनही पाडत त्यांना आपल्या प्रभावीखाली घेण्यात ‘टिप्या’ यशस्वी होत होता.

पोरींना इंप्रेस करणारी पर्सनॅलिटी
टिप्याने स्वत:चे व्यक्तीमत्व असे तयार केले होते, ज्यामध्ये पोरी त्यांच्यावर इंप्रेंस होतील. म्हणून पोरींना ज्या पद्धतीने केस ठेवलेले आवडतात, त्याच पद्धतीने तो हेअर स्टाईल करीत होता. तर त्या पद्धतीचे सेंट आणि परफ्युमचा वापर तो करीत होता.

त्याच्याकडे आहे, अत्तरांचा संग्रह
क्रिमनल म्हणून इमेज असणाऱ्या टिप्याला अत्तरांचा आणि परफ्युमचा शौक आहे. असे सांगतात की त्याच्या विशालनगरच्या घरात अत्तरांचे चांगले कलेक्शन आहे. त्याच्या या कलेक्शनवरही पोरी फिदा होत होत्या. त्याचसाठी टिप्या प्रसिद्ध होता.

ट्युशन क्लासमध्येही टिप्याचीच धतिंग
खासगी ट्युशन क्लासमध्ये येणाऱ्या १० वी १२ वीच्या मुलींवर इंप्रेशन मारण्यात टिप्या माहीर होता. क्लासमध्ये भांडणे झाल्यानंतर तिथे टिप्या येऊन जे इंप्रेशन मारत होता. त्यातून पोरी त्याच्या गळाला लागत होत्या. सिडको एन-२, एन-३ ते टिळकनगर या संपूर्ण परिसरात टिप्याची दहशत होती.

‘त्या’ तरुण पोऱ्यांच्या गाड्यावर त्याची नजर
दहावी आणि बारावीच्या मुलांकडे असणाऱ्या टू व्हीलरवर टिप्याची नजर असायची. त्याच गाड्या तो धतिंगच्या जोरावर घेऊन त्याच क्लासच्या बाहेर स्टंट करायचा. त्यातुनही पोरी इंप्रेस होत होत्या. तर पोरांची फॅन फाॅलोअर वाढत होती. याच पद्धतीने त्याने दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here