Marathwada Sathi

12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्यांवरुन रंगले राजकारण

हसन मुश्रीफांनी केला फडणवीसांवर आरोप, महाजनांनी केलेे खंडन

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ विधान परिषदेच्या सदस्यांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. त्या सदस्यांची नावे देवेंद्र फडणवीस यांनी फायनल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफांनी केला आहे. तर त्या नियुक्त्यांशी आमचा संबंध नसल्याचे भाजपचे माजी मंत्री आणि नेते गिरीष महाजन म्हणाले आहेत.


लोकशाहीत राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन्ही वरिष्ठ सभागृह आहेत. या दोन्ही सभागृहांचे सदस्य अशाच व्यक्तींना करावे, ज्यांचे सामाजिक, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या विषयात तज्ज्ञ आहेत. पण या नियुक्त्या तशा पद्धतीने करण्याच्याऐवजी थेट राजकीय नियुक्त्या केल्या जातात. त्यात महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जो ‘सुसंवाद’ आहे. त्यावरून या नियुक्त्यांवर पुन्हा वादाचा भडका उडण्याची शक्यता आहे.


म्हणून यादी बंद पाकिटात
या सदस्यांच्या नियुक्तीवरून वाद होऊ शकतो म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी ती यादी बंद पाकिटात घालून स्वत: जवळ ठेवली आहे. ती आज राज्यपालांना ते देणार होते. पण तत्पूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्याने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफांनी आरोप केला. त्याला माजी मंत्री गिरीष महाजनांनी उत्तर दिले आहे. पण यादी आणि नावे हे गुलदस्त्यातच आहेत.

Exit mobile version