Marathwada Sathi

पाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरुंची माहिती…!

मराठवाडा साथी न्यूज

मीरा राेड : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार ही झपाट्याने वाढणारी शहरे आहेत. या शहरांमध्ये राज्यातीलच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिक राहायला आणि कामधंदा करण्यासाठी येतात. याशिवाय, या दोन्ही शहरांमध्ये बांगलादेशी, नायजेरियन नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात.यामुळे आता मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रहिवासी अथवा वाणिज्य भाडेकरू ठेवताना त्याची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचे आदेश पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहितेनुसार जारी केले आहेत. भाडेकरूची माहिती न देणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामाेरे जावे लागणार आहे.

घर किरायाने देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही जणांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचे व सोबत असलेल्या कुटुंबीय अथवा सहकाऱ्यांचे फोटोज,मूळ गाव व देशाच्या पुराव्यासह पत्ता, ज्याच्या मार्फत भाडेकरार झाला त्याची माहिती,दुसऱ्या देशातील नागरिक असल्यास पासपोर्ट आणि ज्या कारणासाठी किरायाने या भागात स्थलांतरित झाले आहेत, त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Exit mobile version