Marathwada Sathi

शिर्डीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवणार…!

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर हे साईभक्तांसाठी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे दररोज बारा हजार साईभक्तांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत .शिर्डीत २५ ते ३१ डिसेंबर याकाळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे.

नाताळपासून ३१ डिसेंबरपर्यंत शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे वर्षाच्या शेवटी गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासन आतापासूनच अॅलर्ट झाले आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी संस्थानचे अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींची बैठक झाली.या बैठकीमध्ये शिर्डी संस्थानने केलेल्या व्यवस्थेची माहिती संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दिली

Exit mobile version