Home परळी वैजनाथ परळीत पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहिम

परळीत पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहिम

604
0

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी परळी पोलिसांच्या वतीने वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावण्यात आला. शहरातील चौकाचौकात थांबून पोलिसांनी विनामास्क फिरणारे मोटारसायकल चालक, विनाहेल्मेट फिरणे, सिटबेल्ट न लावणे, गाडीला नंबर फलक नसणे तसेच ड्रायव्हींग लायसन्स नसणार्‍या वाहचालकांवर कारवाई केली.
वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दुपारच्या सुमारास शिवाजी चौक, एकमिनार चौक, उड्डाणपुल तर सायंकाळच्या सुमारास नेहरू चौक (तळ) भागांतील वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. न्यायालयाने वाहतूकीचे घालून दिलेले नियम न पाळणार्‍या वाहनचालकांना पोलिसांच्या वतीने दंड आकारण्यात आला. बर्‍याच वाहनांना नंबर प्लेट नसणे, विनामास्क प्रवास करणे, ड्रायव्हींग लायसन्स न बाळगता गाड्या चालवणे,  चारचाकी गाडीतून प्रवास करतांना सिटबेल्ट न लावणे आदींसारख्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here