Home औरंगाबाद पीएमसीचे सर्वेक्षण सदोष; ना दंड ना कारवाई

पीएमसीचे सर्वेक्षण सदोष; ना दंड ना कारवाई

4
0

सचिन पवार । मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । या प्रोजेक्टचे काम मिळालेल्या पीएमसीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक दोष आढळले आहेत. तसेच मागे पीएमसीच्या चुकीमुळे अनेक गरिबांचे नुकसान झाले. यानंतरही प्रशासनाने पीएमसीवर कुठलीच कारवाई केली नाही.

चौकशी झाली, पण कारवाई प्रलंबीत
या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले होते. त्यानंतर पीएमसीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पडताळणी करणे अपेक्षित होते. परंतु डीपीआरमधील चुका पाहता स्वतः स्थळ पाहणी केलेली नाही, असे स्पष्ट झाले. अनेक वेळा या पीएमसीने केलेल्या चुका समोर आल्या परंतु यानंतरही प्रशासनाने गंभीरतेने घेतल्या नाही. स्वतःची घरे पाडलेले लाभार्थी महापालिकेत आले असता तत्कालीन आयुक्त निपुण विनायक यांनी प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले होते. परंतु नेहमीप्रमाणे या चौकशीचे पुढे काहीच झाले नाही.
पीएमसीला मिळाले दीड हजार रुपये आर्क असोसिएट या एजन्सीला या प्रोजेक्टची पीएमसी म्हणून काम मिळाले आहे. एका सर्वेक्षणा पोटी दीड ते दोन हजार रुपये या कंपनीला मिळतात. प्रत्यक्ष पी एम सी ने प्रत्यक्ष स्थळी न जाता सर्वेक्षण केले असल्याचे दिसून येते. यानंतरही पीएमसी ला ना दंड ठोठावण्यात आला ना कुठली कारवाई झाली.

अधिकाऱ्यांचे साटेलोटे का ?
स्थायी समिती च्या सभेत अनेक वेळा हा विषय चर्चेला आला. परंतु तरीदेखील उपयोग झाला नाही. एवढे केल्यानंतरही कारवाई होत नसेल तर यात अधिकाऱ्यांचे साटे लोटे तर नाही ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here