Home इतर पंतप्रधानांकडून गुरु गोविंद सिंहांना आदरांजली…!

पंतप्रधानांकडून गुरु गोविंद सिंहांना आदरांजली…!

356
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली: शिखांचे दहावे गुरु,गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती.गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली असून गुरु गोविंद सिंहानी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलेआणि आयुष्यभर ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर ट्विट करत गुरु गोविंद सिहांना आदरांजली वाहिली.त्यांनी ट्विट मध्ये लिहिले की,”प्रकाश पर्वाच्या या पवित्र क्षणी मी गुरु गोविंद सिंहांना नमन करतो. त्यांनी आपले जीवन न्यायसंगत आणि समावेशी समाजाच्या निर्मितीसाठी समर्पित केलं. ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिले. या प्रसंगी आम्ही त्यांचे साहस आणि बलिदानाचे स्मरण करतो.”

दरम्यान,शिखांचे दहावे गुरु,गुरु गोविंद सिंह यांनी १६९९ साली बैसाखीच्या दिनानिमित्त खालसा पंथाची स्थापना केली होती.गुरु गोविंद सिंह यांनी जीवनभर अन्याय,अधर्म,अत्याचाऱ्याच्या विरोधात लढा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here