Home पुणे पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला येणार ‘पुण्यात’…!

पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला येणार ‘पुण्यात’…!

254
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष “सीरम इन्स्टिट्यूट”“जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स” या कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीकडे लागले आहे. कोरोनावरील लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.त्यामुळेच ४ डिसेंबर रोजी जगभरातील तब्बल शंभर देशाचे राजदूत एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून, हे सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.

अगोदर राजदूत २८ नोव्हेंबरला पुण्यात येणार होते. मात्र, राजदूत येणार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यानंतर पुण्याला भेट देणार होते. पण राजदूत येऊन गेल्यानंतर पंतप्रधान येणे योग्य नसल्याने प्रथम २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत आणि त्यानंतर राजदूत यांचा दौरा आता २८ नोव्हें. येवजी ४ डिसेंबर ला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here