Home गंगाखेड पिंपळदरी येथील दहशत पसरविणारी गुंडांची टोळी हद्दपार,एस.पी.यांची धडक कार्यवाही

पिंपळदरी येथील दहशत पसरविणारी गुंडांची टोळी हद्दपार,एस.पी.यांची धडक कार्यवाही

80
0

गंगाखेड : सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत महिलांची छेड काढणे, बलात्कार करण्यासह मारहाण करणे घातक शस्त्र बाळगणे जीवे मारण्याच्या धमकी देणे आदी गुन्हे करीत दहशत निर्माण करणार्‍या पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंडांच्या टोळीस जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी हद्दपार केले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड,पालम तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका व बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून तीन जणांच्या टोळीस जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले त्यानुसार पिंपळदरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे यांना अंबाजोगाई येथे नेऊन सोडले.पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत व इतरत्र स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे हे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून त्यांची जिवित किंवा व्यक्तीकगत सुरक्षितता धोक्यात आणणार्‍या कृतीने दुखापत पोचविणे महिलांची छेड काढणे,महिला,मुलींवर बलात्कार करणे जीवे मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करणे, घातक शस्त्रानिशी फिरणे जीवे मारण्याची धकमी देणे,गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्र जवळ बाळगुन दुखापत करणे,घरफोडी,चोरी आदी गुन्हे 2013पासून आजतागायत टोळीतील सदस्यांमार्फत वैयक्ती किंवा एकत्रितपणे गुन्हे घडवून आणून सर्व सामान्य लोकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण केला होता.या टोळी विरूध्द नऊ गुन्हे दाखल असून नवीन सद्सयांना टोळीमध्ये घेऊन गुन्हे करण्याचे त्यांचे कृत्य चालू होते.या टोळी विरूध्द हद्दपार प्रकरणाची सुनावणी चालू असताना देखील टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे आणि टोळी सदस्य मंगेश शिवाजी मुंढे यांनी अदखलपात्र गुन्हे देखील घडवून आणले होते. या सर्व घटनांवरून टोळीप्रमुख व त्याच्या टोळीस कायद्याचा आदर व भिती न राहिल्याने त्यांच्या विरूध्द हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला.त्याबाबत या हद्दपार प्रकरणाची सुनावणी दि. दहा नोव्हेंबर 2020 रोजी झाली. यात टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे यांना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व पालम तालुका व त्या लगतच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका व बीड जिल्ह्यातील परळी तालुका व तालुक्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिले. त्यानुसार त्या तिघांना पिंपळदरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी अंबाजोगाई येथे नेऊन सोडल्याचे माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या निष्पन्न करून त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा गुन्हेगार गुंडां विरूध्द हद्दपार एमपीडीए मोक्का कायद्या अंतर्गत कारवाया करून गुन्हेगार टोळ्यांचा व सरईत गुन्हेगारांचा बिमोड करण्याचा धडाका जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी सुरू केला आसल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here