Marathwada Sathi

पेट्रोल डिझेलचे दर ..


मराठवाडा साथी
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये आज सलग २८ व्या दिवशी कोणताही बदल झाला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर सलग ६ दिवस वाढत होते. आज तेल मार्केटींग कंपन्यांनी किमतींमध्ये कोणताही बदल केला नाही. याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग 48 दिवसांपर्यंत बदलल्या नव्हत्या. नोव्हेंबर २० पासून या किंमती वाढण्यास सुरुवात झाली. दर 17 वेळा बदलले. मार्चनंतर सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात झाले होते. तेल कंपन्यांनी ८२ दिवस कोणता बदल केला नाही. वाढलेल्या एक्साइज ड्युटीसोबत तेलाची कमी झालेल्या किंमतीशी त्यांना ताळमेळ साधायचा होता.

पेट्रोल दर
मुंबई ९०. ३४ रुपये प्रति लीटर
दिल्ली ८३.७१रुपये प्रति लीटर
कोलकाता ८५.१९ रुपये प्रति लीटर
चेन्नई ८६.५१ रुपये प्रति लीटर

डिझेलचे दर
मुंबई दर ८०.५१, रुपये प्रति लीटर
दिल्लीमध्ये ७३.८७ रुपये प्रति लीटर
कोलकाता ७७.४४. रुपये प्रति लीटर
चेन्नईमध्ये ७९.२१ रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.

बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.

Exit mobile version